Mukhyamantri Ladki Bahin Yojna 2024 : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात महीलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (mukhymantri ladki bahin yojna)या योजनेसाठी नोंदणी देखील सुरू झाली. 1 जुलै पासून ही नोंदणी सुरु झाली असून राज्यातील महिलांनी अर्ज करण्यासाठी ठीक ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे.
Table of Contents
Mukhyamantri Ladki Bahin Yojna 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही अटी आणि शर्ती वरून राज्यातील विरोधी पक्ष्यांनी सरकार वर टीकेची झोड उठवली आणि यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात बोलताना काही नियम शितील झाल्याचं सांगितल आहे.
नेमके कोणते नियम शितील झाले आहेत, तेच आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
उपमुखमंत्री अजित पवार यांनी अर्थ संकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतके पैसे थेट त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये भेटणार आहेत. विरोधकांच्या टीकेमुळे आणि सामान्य महिलांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मध्ये 7 महत्त्वाचे बदल केले आहेत.
7 मोठे बदल :
1) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला अर्ज करण्याची मुदत होती फक्त दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 म्हणजेच फक्त 15 दिवस आणि आता हीच मुदत वाढवून तब्बल 2 महिने करण्यात आली आहे. लाभार्थी या योजनेला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांनी या योजनेला अर्ज केला आहे अश्या पात्र महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
2) अगोदर या योजनेला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. परंतु आता महाराष्ट्र सरकारने या मध्ये बदल केला आहे. आता तुमच्या कडे अधिवास प्रमाण पत्र नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड , मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र , जन्म दाखला. या चार पैकी कोणतेही प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
3) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
4) अगोदर या योजनेसाठी फक्त 20 ते 60 वयोवर्ष गटातील महिलाच अर्ज करू शकत होत्या. आता महाराष्ट्र सरकारने या मध्ये बदल केला असून आता 21 ते 65 वयोवर्ष गटातील महिला अर्ज करू शकतील.
5) दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिलेने जर महाराष्ट्रातील पुरुषबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र, पतीचे अधिवास प्रमाण पत्र ग्राह्य धरणात येईल.
6) जर तुमच्या कडे 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला नसेल आणि तुमच्या कडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
7) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करायचा इथे क्लिक करा : क्लिक करा
हे पण पाहा :
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024: असा करा अर्ज? कागदपत्रे काय लागतील?
Panjab National Bank Bharti 2024 : PNB मध्ये मोठी भरती! लगेच अर्ज करा !