व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था. महाराष्ट्र ITI प्रवेश 2024. केंद्रीकृत ऑनलाइन ITI प्रवेश प्रक्रिया-2024. इच्छुक उमेदवारांना आणि पालकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी प्रवेश नियम आणि प्रक्रिया फॉर्म ITI माहिती पुस्तिका वाचून समजून घ्या.
Table of Contents
एकूण जागा : 1,48,568 जागा
कोर्सचे नाव : ITI एडमिशन 2024
शैक्षणिक पात्रता : दहावी पास/नापास
अर्ज करण्याची फी किती असेल ? :
अनुक्रमांक | उमेदवाराचा प्रकार | प्रवेश शुल्क |
---|---|---|
1. | मागासवर्गीय उमेदवार | 100 ₹ |
2. | सर्वसामान्य उमेदवार | 150 ₹ |
3. | महाराष्ट्र राज्या बाहेरील उमेदवार | 300 ₹ |
4. | अनीवासी भारतीय उमेदवार | 500 ₹ |
अर्ज कसा करावा : पूर्ण पद्धत
स्टेप 1 : माहिती पुस्तिका
- प्रादेशिक कार्यालय निहाय शासकीय आणि खाजगी औ.प्र. संस्थांची यादी व प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसाय निहाय जागांचा तपशिल https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- माहिती पुस्तिकेमधील माहिती ही सूचकदर्शी आहे. उमेदवाराने अद्ययावत माहितीकरिता संकेत स्थळावर उपलब्ध माहितीशी सत्यता पडताळून पहावी.
स्टेप 2 : ऑनलाईन अर्ज भरणे व अर्ज शुल्क जमा करणे
- सर्व इच्छुक उमेदवारांनी प्रवेशाच्या प्रथम फेरीकरिता https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर विहीत वेळापत्रका नुसार नोंदणी करणे व प्रथम फेरीसाठी विकल्पांच्या पसंती क्रमासह ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज कुठल्याही स्रोतामधून भरता येईल. अर्ज स्विकृती केंद्रे ही सुविधा उमेदवाराकडून प्रपत्र – ४ मध्ये नमूद शुल्क आकारुन उपलब्ध करुन देतील.
- सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणीक्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल. उमेदवारास पुढील प्रवेश प्रक्रियेकरिता या खात्यामध्ये त्याचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड चा उपयोग करुन प्रवेश ऑनलाईन (Login) करावा लागेल.
- प्रवेश अर्जामध्ये उमेदवाराकडून नोंदवण्यात येणारा प्राथमिक मोबाईल क्रमांक (Primary Mobile Number) हा DGT New Delhi यांच्या स्किल इंडिया डिजिटल हब (SIDH) पोर्टलवर लॉगिन आयडी म्हणून वापरण्यात येणार असल्यामुळे, हा नंबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे उमेदवारासाठी आवश्यक असणार आहे.
- राज्याबाहेरील व अनिवासी भारतीय उमेदवारांनासुध्दा विहीत कालावधीमध्येच नोंदणी करणे आवश्यक राहील. परंतु त्यांचा विचार प्रवेशाच्या चौथ्या फेरीमध्येच होणार असल्यामुळे त्यांना विहीत वेळापत्रकानुसार चौथ्या फेरीसाठी विकल्प सादर करावे लागतील.
- उमेदवारांनी संपुर्ण प्रवेश अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवे च्या माध्यमातुन प्रवेश अर्ज शुल्क जमा करावे.
- प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल.
- प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती / दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मुळ दस्तऐवज / कागदपत्रे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रतींचा (Photocopy) एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) नजिकच्या औ.प्र. संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज / कागदपत्रांप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास “अर्ज निश्चितीकरण पावती” (ApplicationConfirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील.
- प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यातप्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
- ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज निश्चित केलेला आहे त्याच प्रवेश अर्जाचा पुढील प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाईल. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज निश्चित केलेले नसतील असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.
- उमेदवाराने फक्त एकच ऑनलाइन अर्ज भरुन सादर करावा जो की केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेमार्फत शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही व्यवसायाच्या शासकीय अथवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशाकरिता उपलब्ध होणाऱ्या जागेकरिता भरता येईल.
- उमेदवारांने एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास / सादर केल्यास त्यास नक्कल अर्ज समजण्यात येईल आणि असे अर्ज उमेदवाराशी कुठल्याही प्रकारे संपर्क न साधता रद्द करण्यात येतील व अशा उमेदवारांना केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेमध्ये प्रवेश घेण्यास प्रतिबंध करण्यांत येईल.
स्टेप 3 : महाराष्ट्रातील, महाराष्ट्र राज्याबाहेरील आणि अनिवासी भारतीय उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
- महाराष्ट्र राज्यातील, महाराष्ट्र राज्याबाहेरील आणि अनिवासी भारतीय उमेदवारांची नियम क्र. ९.१ नुसार गुणवत्ता क्रमांक दर्शविणारी तात्पुरती गुणवत्ता यादी दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व अर्ज स्विकृती केंद्रावर व ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येईल.
- उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात Login करुन तसा बदल करावा. तद्नंतर कोणत्याही प्रकारे प्रवेश अर्जात बदल करता येणार नाही.
- सर्व पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी विहीत वेळापत्रकानुसार सर्व अर्ज स्विकृती केंद्रावर व ऑनलाईनरीत्या प्रसिध्द करण्यात येईल.
- उमेदवारास त्यांच्या Login व्दारे प्रवेशाची स्थिती, जागा वाटप, सूचना, पुढील प्रवेश फेरी करिताची पात्रता जाणून घेता येईल.
टिपः उमेदवारास गुणवत्ता क्रमांक हा त्याच्या संबंधित पात्रतेनुसार प्राप्त झालेला असतो व त्यामुळे त्याची कोणत्याही व्यवसायात प्रवेशाची हमी देता येत नाही.
स्टेप 4 : प्रवेश फेरीसाठी पर्याय देणे
- उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर मूळ कागदपत्रांसह नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्वतः उपस्थित राहून प्रवेश अर्ज निश्चित करणे आवश्यक आहे यानंतर उमेदवारासप्रथम फेरीसाठी औ.प्र. संस्था व व्यवसायनिहाय विकल्प व पसंतीक्रम सादर करावे लागतील.
- सर्व पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- उमेदवारास पुढील प्रवेश फेरींकरिता त्याच्या प्रवेश खात्यामध्ये Login करुनच दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीकरिता विहीत वेळापत्रकानुसार नव्याने विकल्प द्यावे लागतील.
- महाराष्ट्र राज्याबाहेरील आणि अनिवासी भारतीय उमेदवारांना चौथ्या प्रवेश फेरीसाठी चौथ्या फेरीमध्ये द्यावयाचे विकल्प सादर करावयाच्या विहीत वेळापत्रकानुसार द्यावे लागतील.
- महाराष्ट्र राज्याबाहेरील आणि अनिवासी भारतीय उमेदवारांना चौथ्या प्रवेश फेरीसाठी चौथ्या फेरीमध्ये द्यावयाचे विकल्प सादर करावयाच्या विहीत वेळापत्रकानुसार द्यावे लागतील.
- प्रथम, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेरीमध्ये नव्याने विकल्प दिल्यानंतर उमेदवारांना कुठल्याही अर्जस्विकृती केंद्रामध्ये जाऊन अर्ज निश्चितीकरणाची व कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. १३.४.६ संबंधित फेरीमध्ये विकल्प बदलण्यासाठी दिलेल्या विहीत वेळापत्रकानुसार उमेदवार त्याला वाटेल तितक्या वेळेस त्याच्या Login मधून विकल्प बदलवू शकतो.
- जर उमेदवारास जागा मिळाली नाही व त्याने दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेरीकरिता नव्याने विकल्प सादर केले नाही तर उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले विकल्प पुढील प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील.
- पाचवी व सहावी प्रवेश फेरी म्हणजे समुपदेशन फेरीमध्ये उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार बोलाविण्यात येईल व त्याच्या मागणीनुसार व उपलब्धतेनुसार जागा देण्यात येईल
स्टेप 5 : जागा वाटप करणे (Allotment of Seat)
- पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीमध्ये नियम क्र. ११, १२ व १३ नुसार जागा देण्यात येतील.
- जागा वाटपाची यादी विहीत वेळापत्रकानुसार सर्व अर्ज स्विकृती केंद्रावर व ऑनलाईन प्रसिध्द करण्यात येईल.
- जागा मिळालेल्या उमेदवारास जागा मिळाल्याचे पत्र (Allotment Letter) त्याच्या प्रवेश खात्यामध्ये तसेच सर्व अर्ज स्विकृती केंद्रामध्ये उपलब्ध राहील.
स्टेप 6 : संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यक्तीशः हजर राहून केंद्रीय प्रवेश प्रक्रीया फेरीमध्ये प्रवेशाचे निश्चितीकरण करण्याचे नियमः
- जागा मिळालेल्या उमेदवाराने जागा मिळालेल्या पत्राची (Allotment Letter) प्रिंट आऊट काढावी व जागा मिळालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तिशः हजर व्हावे.
- सोबतच्या प्रपत्र-३ मध्ये दिल्यानुसार पात्रतेच्या व आरक्षणानुसार केलेल्या प्रवेश अर्जातील दाव्याच्या पुष्ट्यर्थ उमेदवार सर्व मूळ कागदपत्रे सादर करतील, तसेच सोबत सर्व कागदपत्रांची सत्य प्रतींचा १ संच, २ रंगीत छायाचित्रे (Passport size) आणि प्रशिक्षण शुल्क विहीत कालमर्यादेमध्ये जागा मिळालेल्या औ.प्र. संस्थेमध्ये जमा करेल.
- प्रपत्र – २ मध्ये औ.प्र. संस्थानिहाय प्रशिक्षण शुल्काचा तपशील देण्यात आला आहे.
- खाजगी औ.प्र. संस्थाकरिता जमा करावयाचे प्रशिक्षण शुल्क खाजगी औ.प्र.संस्थांनी विहीत केलेल्या स्वरुपात (रोख, धनाकर्ष वा धनादेश) भरण्यात यावेत. संबंधित खाजगी औ.प्र. संस्थांच्या परवानगीने प्रशिक्षण शुल्क हप्ते निहाय जमा करता येतील पण शुल्क हप्ते निहाय जमा करण्याचा निर्णय हा संपूर्णतः संबंधित खासगी औ.प्र. संस्थेचा असेल.
- शासकीय औ.प्र. संस्थेकरिता भरावयाचे प्रशिक्षण शुल्क संबंधित शासकीय औ.प्र. संस्थेमध्ये रोखीने एकाच वेळेस जमा करावे.
- उमेदवाराने प्रवेश अर्जामध्ये केलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ त्याने जमा केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची संबंधित औ.प्र.संस्था काळजीपूर्वक छाननी करतील. उमेदवाराचा प्रकार, प्रवर्ग पात्रता इ. च्या दाव्यात अथवा दाव्याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या संबंधित उमेदवाराच्या नजरेस आणुन देण्यात येतील.
- उमेदवार विहीत वेळापत्रकानुसार नियोजित प्रवेश फेरीकरिता उपलब्ध मुदतीत आवश्यक कागदपत्रे अहवाल सादर करावयाच्या कालमर्यादेमध्ये सादर करु शकतील.
- उमेदवाराने एखाद्या दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेतल्यामुळे जर तो प्रवेशाच्या वेळेस मूळ कागदपत्रे सादर करु शकत नसेल तर त्याला अशा संस्थेत विशिष्ट दिनांकास विशिष्ट अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यामुळे त्यांची मूळ कागदपत्रे संस्थेत ठेवण्यात आल्याबाबत त्या संस्थेच्या संस्थांप्रमुखांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. उमेदवारास अशा संस्थेच्या संस्थाप्रमुखाने प्रमाणपत्राच्या सत्यापन केलेल्या सत्यप्रती सादर कराव्या लागतील. अशा उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रवेशाच्या वेळेसच तात्काळ भरावे लागेल आणि अशा उमेदवारांना शुल्क जमा केल्याच्या तारखेपासून ४ कार्यालयीन कामकाजांच्या दिवसांच्या आत कागदपत्रे जमा करण्याची परवानगी देण्यात येईल.
- उमेदवारास प्रवेश विहीत केल्यानंतर संबंधित उमेदवाराचा अंतिम शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा मूळ दाखला व माध्यमिक शालांन्तु प्रमाणपत्र परीक्षा (SSC) गुणपत्रकाची मूळ प्रत संबंधित संस्थेत जमा करुन घेण्यात येईल. एखादया उमेदवाराने संस्थेत अभ्यासक्रमात जर एकदा प्रवेश घेतला तर अशा उमेदवाराने प्रवेश रद्द केल्याशिवाय वा प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय त्याला हा शाळा सोडल्याचा मूळ दाखला व माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षेच्या गुणपत्रकाची मूळ प्रत परत करण्यात येणार नाही. इतर सर्व प्रमाणपत्रे/ कागदपत्रे प्रवेशाच्या वेळीच मूळ प्रतीवरुन छाननी करुन उमेदवाराला परत करण्यात येतील.
- जे उमेदवार सर्व बाबी पूर्ण करतील त्यांच्यासाठी संबंधित औ.प्र. संस्था दिलेल्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया संस्थेच्या Login मधुन पूर्ण करतील. १३.६.११ प्रवेश निश्चित करण्याची Online प्रक्रिया झाल्यानंतर शेवटी प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र पोचपावती(Admission Confirmation Slip) म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रणालीव्दारे तयार केली जाईल. १३.६.१२ संबंधित औ.प्र.संस्था पोच पावतीच्या दोन प्रतींची प्रिंटआऊट घेतील. यामधील एक प्रत प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह संबंधित प्रवेशित उमेदवाराला देण्यात येईल व दुसरी प्रत संस्थेमध्ये ठेवण्यात येईल.
- ऑनलाईन प्रवेश निश्चिती करणाची प्रक्रिया राबविणे व त्यानुसार उमेदवारांची माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी संबंधित औ.प्र. संस्थेच्या प्राचार्यांची राहील. जर दिलेली ऑनलाईन प्रवेश निश्चिती प्रक्रिया पार पाडण्यास संस्था असमर्थ ठरली तर अशा अहवाल अप्राप्त प्रवेशाकरिताच्या जागा पुढील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भरल्या जातील.
- जर एखादा उमेदवार प्रवेश देऊ केलेल्या औ.प्र. संस्थेत प्रवेशाकरिता दिलेल्या मुदतीमध्ये संबंधित औ.प्र. संस्थेमध्ये हजर राहून अहवाल सादर करणार नाही तर अशा उमेदवाराचा त्याला वाटप झालेल्या जागेवरील प्रवेशाचा दावा रद्द होईल.
- अशा प्रकारे रिक्त राहिलेल्या जागा पुढील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध केल्या जातील.
स्टेप 7 : पाचवी प्रवेशफेरी जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीः
- चौथ्या प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा पाचव्या प्रवेश फेरीकरिता उपलब्ध राहतील.
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण/अनुत्तीर्ण व अद्यापपर्यंत कोठेही प्रवेश न घेतलेल्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाचव्या प्रवेश फेरीपूर्वी नव्याने अर्ज करण्याची व/वा अर्जात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
- पाचव्या प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.
- औ.प्र.संस्थांमध्ये प्रवेशोच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रवेश खात्यात Login करुन कोणत्याही एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरिता दिलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणी करावी.
- जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी राबविणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची यादी प्रपत्र – ५ मध्ये देण्यात येत आहे.
- संगणक प्रणालीव्दारे जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी जिल्हा निहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल तसेच उमेदवारांना समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करण्यात येईल.
- दिलेल्या वेळ व दिनांकास उमेदवारांना गुणवत्तेनुसार क्रमाने समुपदेशनाकरिता बोलाविण्यात येईल.
- प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर त्या जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांतिल प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.
- वाटप झालेल्या जागेकरिता प्रवेश घेण्याची प्रक्रीया संबंधित उमेदवाराने “टप्पा क्र. VI संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यक्तीशः हजर राहून केंद्रीय प्रवेश प्रक्रीया फेरीमध्ये प्रवेशाचे निश्चितीकरण करण्याचे नियम” मध्ये विशद केल्यानुसार निवड पत्रावर (Allotment Letter) दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावी.
स्टेप 8 : संस्था स्तरावरील प्रवेशः
- मुद्दा क्र. १.४ मध्ये नमूद संस्था स्तरावरील प्रवेशासाठी संस्थेत उपलब्ध जागा व पाचव्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा खाजगी औ.प्र. संस्थाना संस्था स्तरावर भरण्यासाठी उपलब्ध राहतील.
- खाजगी औ.प्र. संस्थामधील संस्था स्तरावरील जागांसाठी प्रवेशोच्छुक उमेदवारांना देखील https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
- नोंदणीकृत उमेदवारांना ज्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संस्थेत उमेदवाराने व्यक्तीशः हजर राहून “टप्पा क्र. VI – संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यक्तीशः हजर राहून केंद्रीय प्रवेश प्रक्रीया फेरीमध्ये प्रवेशाचे निश्चितीकरण करण्याचे नियम” मध्ये विशद केल्यानुसार प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी.
- केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या दिवसापासून ते प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संस्था स्तरावरील जागांवर उमेदवारांना प्रवेश घेता येतील.
स्टेप 9 : प्रवेशोत्तर कार्यवाहीः
- सर्व औ.प्र.संस्थांनी प्रवेशाची प्रक्रीया प्रवेशाच्या वेळापत्रकामध्ये स्पष्ट केल्यानुसार प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक राहील. अंतिम दिनांकानंतर कोणत्याही प्रवेशास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत मान्यता दिली जाणार नाही.
- ऑनलाईन प्रवेश निश्चिती प्रक्रीया संकेतस्थळ प्रवेशाच्या अंतिम तारखेस व वेळेस बंद केले जाईल.
- सर्व शासकीय व खाजगी औ.प्र.संस्थांचे प्राचार्य त्यांच्या संस्थेच्या लॉगइनवरुन “Manage Trainee” या पर्यायावरुन प्रवेशित उमेदवारांना तुकडी व पाळी (Shift) बहाल करतील. तसेच स्वाक्षरी व छायाचित्र “Upload Photo with Signature” या पर्यायावरुन प्रवेशाच्या अंतिम दिनांकापासून १५ दिवसांपर्यंत विनाविलंब शुल्क व पुढील १५ दिवसांकरिता विलंब शुल्कासह अपलोड करतील.
- प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर औ.प्र. संस्थेचे प्राचार्य प्रवेशित उमेदवारांच्या याद्यांचे व वरीलप्रमाणे “Manage Trainee” बाबत कार्यवाहीच्या प्रिंटआऊट घेतील व त्यावर स्वाक्षरी करुन ती प्रत संबंधित प्रादेशिक कार्यालयास सादर करतील. प्रादेशिक सहसंचालक प्रवेशित उमेदवाराने प्रवेश निश्चिती प्रक्रीयेच्या वेळेस पात्रतेच्या अटींची पूर्तता करतात किंवा नाही याच्या दाव्यापुष्ट्यर्थ सादर केलेल्या दस्तऐवजांची तपासणी करुन प्रवेशित उमेदवारांच्या याद्यांना अंतिम मंजुरी प्रदान करतील.
अधिकृत वेबसाइट : https://admission.dvet.gov.in/
ऑनलाइन अर्ज इथून करा : पाहा
पूर्ण जाहिरात : पाहा
पूर्ण माहिती पुस्तिका : पाहा
आणखी वाचा :
BAMU Bharti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा
CDAC Bharti 2024 : CDAC मध्ये मोठी भरती, लगेच आवेदन करा.
Jilhaadhikari bharati 2024 : जिल्हा अधिकारी कार्यालया मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती.
India Post Office Bharti 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये महाभरती , लगेच अर्ज करा