Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024: महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून महाराष्ट्र सरकार एक नवीन योजना घेऊन आल आहे. या योजनेच नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 अस आहे. या योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये आर्थिक साहाय्य दिले जाईल . ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या महिलांना राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज भरण्यास सांगितल आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
महाराष्ट्राचे अर्थ मंत्री मा.श्री अजित दादा पवार यांनी अर्थ संकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू असणाऱ्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे .
ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन या योजनेपासून प्रेरित होऊन बनवली गेली आहे. कमकुवत आर्थिक परिस्थिती मुळे महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाही आणि त्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहाव लागत. आणि यामुळेच महाराष्ट्र सरकार या योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – तुम्ही पात्र आहात का?
पात्रतेच्या अटी :
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी असण आवश्यक आहे.
- या योजने अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलाच या योजनेसाठी पात्र असतील.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरीब महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते सर्व या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे
यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड या पेजवर टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला Proceed पर्यायावर क्लिक करायचं आहे
तुम्ही क्लिक करताच माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
आता तुम्हाला अर्जात विचारलेली माहिती टाकायाची आहे.
यानंतर तुम्हाला अर्जात विचारलेली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
शेवटी तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. एकदा ते झळ की, दर महिन्याला तुमच्या बँक खात्यावर 1500 रुपयांची आर्थिक मदत पाठवली जाईल.
हे पण पाहा :
MahaTransco Bharti 2024 : खूशखबर.. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती
SSC CGL Bharti 2024 : लगेच अर्ज करा! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती